• Mon. Jan 13th, 2025

शहरातून भाविकांचा जथ्था मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना

ByMirror

Apr 12, 2022

देशाच्या व समाजातील एकता, अखंडता आणि सुख-समृध्दीसाठी केली जाणार प्रार्थना

अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाचे निर्बंध शिथील झाले असताना, शहरातून मुस्लिम भाविक मंगळवारी (दि.12 एप्रिल) मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी रवाना झाले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशातील मुस्लिम भाविकांना तब्बल दोन वर्षापासून जाता आले नाही. शहरातील भाविकांचा पहिला जथ्था रमजानच्या पवित्र महिन्यात तांबोली हज टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून रवाना झाला आहे.
शहरातून मक्का-मदिना (उमरा) यात्रेसाठी अब्दुस सलाम, मन्सूर शेख, हाजी शौकत तांबोली, हाजी इरफान, गुलामभाई चमडेवाले, एजाज तांबोली, नासीर इनामदार, गम्मू हाजीसहाब आदी यात्रेकरु रवाना झाले आहेत. नगर-औरंगाबाद महामार्ग येथील जुने आरटीओ कार्यालयापासून यात्रेकरु खासगी बसने मुंबई येथील विमानतळाकडे रवाना झाले. सर्व यात्रेकरु विमानाने मंगळवारी रात्री मक्का येथे पोहचणार आहे. यात्रेकरुंना शुभेच्छा देण्यासाठी त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहरातून गेलेले भाविक देशाच्या व समाजातील एकता, अखंडता व सुख-समृध्दीसाठी प्रार्थना करणार आहे. रमजान ईदची नमाज अदा करुन भाविक आपल्या मायदेशी परतणार आहे. शहरातून एकूण चाळीस भाविक दोन टप्प्यात जाणार असून, पहिल्या टप्प्यातील भाविक रवाना झाले असल्याची माहिती हाजी शौकत तांबोली यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *