• Thu. Jan 16th, 2025

वेश्यांसाठी आलेले अनुदान अपहार प्रकरणी चौकशी करण्याचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

ByMirror

Feb 16, 2022

आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांची माहिती

अहमदनगर (प्रतिनिधी)- वेश्यांसाठी आलेले अनुदान शहरातील एका संस्थेने अपहार केल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांकडे करुन त्यांची भेट घेतली असता, पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍याला चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आरपीआयचे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांनी दिली.
नगर शहरात व जिल्ह्यात एड्सबाधित, वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी कार्य करणार्‍या एका संस्थेने कोरोनाच्या टाळेबंदीत केंद्र सरकारकडून आलेल्या अनुदानात केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आरपीआय (आठवले) चे माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे यांनी केली होती. शहरात एड्स बाधित व वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलांसाठी कार्य करणार्‍या एका संस्थेला केंद्र सरकारकडून कोरोनाच्या टाळेबंदीत प्रत्येकी 15 हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले होते. या अनुदानाच्या यादीत घरगुती, सर्वसाधारण महिला व लहान मुली ज्यांचा वेश्या व्यवसायासाठी कुठलाही संबंध नाही, अशा महिलांची नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचा आरोप तक्रारदार एका महिलेने केला होता.
याप्रकरणी आरपीआयच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. यानंतर तक्रारदार महिलेकडे असलेले सर्व पुरावे घेऊन पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले आहे. या कागदपत्रांची पहाणी करुन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक पोलिस स्टेशनच्या प्रमुखांना फोन करून सदर घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. तर सदर पुरावे स्थानिक पोलीस स्टेशनला दिले असता त्यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचे पाटोळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हंटले आहे. या प्रकरणी पाटोळे, बंटी भिंगारदिवे, अतुल भिंगरे, संदीप आहेर, चंद्रकांत ठोंबरे पाठपुरावा करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *