निमगाव वाघा फाट्यावर वृक्षरोपण अभियान
पर्यावरणाचे ऋण न फेडता येणारे -डॉ. संतोष साळवे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नागरिकांना गावरान शेती उत्पादनांचा पुरवठा करणार्या फार्म फ्रेशच्या वतीने वृक्षरोपण करुन पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत योगदान दिले आहे. निमगाव वाघा फाटा (ता. नगर) येथे झालेल्या वृक्षरोपण अभियानाची सुरुवात फळ झाडे लावून करण्यात आली. यावेळी मनसे चे शहर सचिव डॉ. संतोष साळवे, सुभाष कांडेकर, अमोल कांडेकर, फार्म फ्रेशच्या संस्थापिका प्राची वाकडे, प्रदीप साळवे, सीमा पिंपळे, प्रियंका कांडेकर, पूजा साळवे, कोमल खरमाळे, मोरे, पाडळे आदींसह महिला उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात प्राची वाकडे यांनी फार्म फ्रेशच्या माध्यमातून जिल्ह्यात शेती उत्पादनांचे गावरान खाद्य नागरिकांना पोहचिण्याचे काम सुरु असून, शेतकर्यांच्या उत्पादनाला देखील चांगला भाव दिला जात आहे. आरोग्यासाठी शुध्द व गावरान खाद्यांची आवश्यकता असून, नागरिकांचे आरोग्य जपण्याचे कार्य केले जात आहे. पर्यावरणाचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी वृक्षरोपणाशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. संतोष साळवे म्हणाले की, पर्यावरणाचे ऋण न फेडता येणारे आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना प्रत्येकाने कर्तव्य म्हणून वृक्षरोपण करण्याची गरज आहे. नागरिकांचे आरोग्य जपण्याबरोबरच पर्यावरणाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फार्म फ्रेशने पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत घेतलेला पुढाकार कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थित प्रत्येकाच्या हस्ते झाडे लावण्यात आली असून, त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी फार्म फ्रेशने घेतली आहे.