अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक व उद्योग क्षेत्रात योगदान देणारे वासन उद्योग समूहाचे तरुण वासन यांच्या वाढदिवसानिमित्त जनक आहुजा यांनी त्यांचे अभिष्टचिंतन करुन शुभेच्छा दिल्या.
यावेळी विजय वासन, पितांबर भामरे, तेजी बेदी, हरिश शर्मा, प्रिती नेरकर, अनिश आहुजा, दिपक जोशी, अविनाश अडोळकर आदी उपस्थित होते.

तरुण वासन यांचा वाढदिवस राज्यात विविध ठिकाणी वासन उद्योग समूहाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. गरजूंना विविध साहित्य व अन्न-धान्याचे वाटप करण्यात आले. नाशिक येथे झालेल्य अभिष्टचिंतन सोहळ्यात त्यांचा सत्कार सोहळा पार पडला.
