• Tue. Mar 10th, 2026

लेदर प्रोडक्टस प्रशिक्षणाचा समारोप

ByMirror

Sep 23, 2022

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बार्टी व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या

युवकांनी उद्योग विश्‍वात आपले भवितव्य घडवावे -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांनी उद्योग विश्‍वात आपले भवितव्य घडवावे. या क्षेत्रात अनेक संधी असून, नवनवीन उद्योग क्षेत्र नव्याने निर्माण होत आहे. प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक युवक-युवतींनी आपले उद्योग थाटून अनेक बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करुन देण्याचे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.


जिल्हा उद्योजकता विकास केंद्र पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र अहमदनगर आयोजित तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी (पुणे) व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री यांच्या विशेष सहकार्याने विशेष घटक योजने अंतर्गत घेण्यात आलेल्या लेदर प्रोडक्टस प्रशिक्षणाच्या समारोपप्रसंगी आमदार जगताप बोलत होते.

यावेळी जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे, रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे संस्थापक व प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, जिल्हा उद्योजकता विकास केंद्रचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी दिलावर सय्यद, महानगरपालिकेचे शहर अभियंता परिमल निकम, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, लेखक डॉ. रोहिदास उदमले, भैय्या बॉक्सर, अमोल डोळस, उद्योजक बाबासाहेब आंबेडकर आदी उपस्थित होते.
10 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर या एक महिन्याचा प्रशिक्षण शहरातील व तालुक्यातील युवक युवतीनी सहभाग घेऊन यशस्वीपणे पूर्ण केला. राज्यात प्रथमच अशा पध्दतीने लेदर प्रोडक्टस प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप आमदार जगताप यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र वितरण करुन करण्यात आला. प्रशिक्षणार्थी युवक-युवतींनी बनवलेल्या विविध प्रकारच्या वस्तूचे प्रदर्शन यावेळी भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाची उपस्थित पाहुण्यांनी पहाणी करुन प्रशिक्षणार्थी युवकांचे कौतुक केले. यावेळी लेखक डॉ. रोहिदास उदमले लिखित संत रोहिदास महाराज तात्विक व शैक्षणिक विचार या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रशिक्षक अमोल सोनवणे, रवी गाडे, विकास बोरूडे, किरण भागवत, संतोष कदम, विशाल पोटे, संतोष कांबळे यांचा सन्मान करण्यात आला.


जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी भविष्यात अशाच प्रकारचे विविध प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन युवक युवतींना यशस्वी उद्योजक होण्यासाठी व उद्योग उभारणीसाठी शासनाच्या विविध योजनाचा लाभ व सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले. रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष संजय खामकर यांनी समाजातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार निर्मिती होण्याच्या उद्देशाने विविध उपक्रम राबवून, तर संस्थेच्या माध्यमातून नवउद्योजक घडविण्यासाठी सर्व संस्थेचे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.


दिलावर सय्यद यांनी बार्टीच्या प्रकल्प विषयी माहिती दिली. प्रास्ताविक जिल्हा उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी तात्यासाहेब जिवडे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी सुभाष मराठे, संदिप सोनवणे, दिलीप काबंळे, बार्टीचे समतादूत एजाज पिरजादे, प्रेरणा विधाते, रजत अवसक, संतोष शिंदे, वसंत बढे, रवी कटके, सुलतान सय्यद यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *