अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आमदार निलेश लंके यांनी राष्ट्रीय कुस्ती व ज्युदोपटू प्रियंका डोंगरे-ठाणगे या खेळाडूचा सत्कार केला.
नगर तालुक्यातील द्वारका लॉन येथे झालेल्या एका कार्यक्रमात हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी यावेळी भाऊसाहेब ठाणगे, आमदार लंके यांचे स्विय सहाय्यक शिवा कराळे उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले की, डोंगरे भगिनींनी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या कुस्ती व ज्युदो खेळात नाव कमावले. राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धेत त्यांनी यश संपादन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.
प्रियंका डोंगरे-ठाणगे या एनआयएस झाल्या असून, त्यांना क्रीडा व युवक संचानलयाचाआदर्श युवती पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्या देवराम गंगाराम शेळके पाटील माध्यमिक विद्यालय खारे कर्जुने येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. तर सामाजिक कार्यकर्ते तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांची कन्या आहे.