रक्तदाता हा गरजू रुग्णाला नवजीवन देणारा देवदूत -गणेश आनंदकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक ऋण फेडण्यासाठी प्रत्येकाने सेवाभाव जपला पाहिजे. सेवाभावाने विविध माध्यमातून जनसेवा करण्याची गरज आहे. रक्तदानाने एखाद्याचे व्यक्तीला जीवदान मिळत असते. रक्तदाता हा गरजू रुग्णाला नवजीवन देणारा देवदूत ठरत असल्याचे प्रतिपादन गणेश आनंदकर यांनी केले.
सारसनगरच्या भगवान बाबानगर मध्ये राज्यकर्ते प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यावेळी आनंदकर बोलत होते. यावेळी महेश पाखरे, ऋषी बडे, नितीन रासकर,महेश आनंदकर, संतोष फुलारे, विलास माने, बंटी भिगारदिवे, अजय धोत्रे, रवी गव्हाणे, तुषार माळवदकर, महेश गिते, शुभम धुमाळ, अक्षय आनंदकर, विकी गायकवाड, सोनू धायताडक, शुभम गायकवाड, मयूर शेख, अमोल जायभाय, सुरज फुलारे, गणेश घुले, विशाल बांगर, नागेश जायभाय, गणेश औटी, स्वप्निल जायभाय, स्वप्निल वारे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे आनंदकर म्हणाले की, रक्तासाठी मनुष्य मनुष्यावरच अवलंबून असल्याने, रक्तदान करुन सर्वसामान्य व्यक्ती देखील समाजकार्यात हातभार लावू शकतो. सेवाभावाने प्रत्येकाने रक्तदान करण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्रतिष्ठानचे गणेश आनंदकर यांच्या पुढाकाराने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रक्तदान केलेल्या युवकांचा यावेळी प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिरासाठी आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.
