अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियाच्या वतीने नोव्हेंबर 2022 मध्ये घेण्यात आलेल्या सीए परीक्षेत यश अभय श्रीश्रीमाळ चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे.

आजी कमलाबाई श्रीश्रीमाळ यांच्या प्रेरणा व आशीर्वादाने यश मिळविल्याचे यश याने सांगितले आहे. यश याला परीक्षेसाठी देसरडा भंडारी क्लासेस, सीए नीलम भंडारी, सीए रोहित बोरा सर यांचे मार्गदर्शन लाभले.
सी.ए. परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल शहरातील युनाइटेड सिटी हॉस्पिटलच्या वतीने यश याचा हॉस्पिटलचे संचालक डॉ. इमरान शेख, डॉ. अजय वानखेडे, डॉ. किरण कुलथे यांनी सत्कार केला. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
