अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या माध्यमातून ओम मोबाईल गॅलरीत पार पडली सोडत
51 ग्राहकांना फेटे बांधून एकाचवेळी ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी चे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- मोबाईल खरेदीच्या सोडतमध्ये भाग्यवान विजेते अभिषेक भोसले यांना थेट दुबई सहलीचे बक्षिस मिळाले. अहमदनगर मोबाईल असोसिएशनच्या वतीने एमआयडीसी सह्याद्री चौक येथील ओम मोबाईल गॅलरी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी व पाडव्यानिमित्त मोबाईल खरेदी केलेल्या ग्राहकांच्या कुपनची सोडत नुकतीच काढण्यात आली. यामध्ये भोसले भाग्यवान विजेते ठरले. तसेच यावेळी ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी मोबाईलचे अनावरण करुन 51 ग्राहकांना या मोबाईलची विक्रमी विक्री करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी ओप्पो कंपनीचे ब्रँच मॅनेजर हर्षल राठी, डिस्ट्रीब्युटर प्रीतम तोडकर, टीम लिडर अक्षय गुप्ता, ओम मोबाईल गॅलरीचे संचालक वैभव भोराडे, संदीप पवार, प्रसाद भवर, शुभम काशीद, अदनान सय्यद, रोहित वाडेकर, रविराज चिट्टयाल आदी उपस्थित होते.
ओम मोबाईल गॅलरी अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्समध्ये दिवाळी व पाडव्यानिमित्त मोबाईल खरेदीवर ग्राहकांना लकी ड्रॉ कुपन देण्यात आले होते. या जमा झालेल्या कुपनची सोडत काढून भाग्यवान विजेत्यास दुबई सहलीचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. तर बाजारात दाखल झालेल्या ओप्पो रेनो 8 टी फाईव्ह जी मोबाईल खरेदी करणार्या ग्राहकांना फेटे बांधून मोबाईल वितरीत करण्यात आले. मोबाईल अनावरण झाल्यानंतर पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओप्पो रेनो 8 टी ची विक्री करण्याचा मान ओम मोबाईल गॅलरीला मिळाला आहे.

ओप्पो कंपनीचे ब्रँच मॅनेजर हर्षल राठी म्हणाले की, ओम मोबाईल गॅलरीच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तमप्रकारे सेवा दिली जात आहे. या सेवेच्या आधारे एकाचवेळी ग्राहकांना तब्बल 51 मोबाईलची विक्रमी विक्री करण्यात आली आहे. तर व्यवसाय करण्याबरोबर ग्राहकांना विविध प्रकारे सवलत, योजना व बक्षिसं दिली जात असल्याने ग्राहक देखील त्यांना जोडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
मोबाईल गॅलरीचे संचालक वैभव भोराडे म्हणाले की, ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्याचे ध्येय ठेऊन व्यवसाय सुरु आहे. फक्त व्यवसायाचा उद्देश न ठेवता दिल्या जाणार्या सेवेमुळे मोठा ग्राहकवर्ग जोडला गेला आहे. अनेक वर्षापासून मोबाईलच्या खरेदीवर विविध योजना राबविण्यात येत आहे. दिवाळी खरेदीवर देखील आकर्षक सुट देऊन दुबई सहलीचे बक्षिस ठेवण्यात आले होते. या योजनेला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे त्यांनी सांगितले.
दुबई ट्रिपचे विजेते ग्राहक अभिषेक भोसले यांनी फक्त 8 हजार किंमतीच्या मोबाईलवर दुबई सहलचे बक्षिस मिळत असल्याचा पहिल्यांदा विश्वास बसला नाही, मात्र या बक्षिसामुळे मोठा आनंद होत आहे. परदेशवारीचे स्वप्न साकार होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
