अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत संस्था) आणि जन शिक्षण संस्थान अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला.
बार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने 7 एप्रिल ते 16 एप्रिल या कालावधीत सामाजिक समता सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने महिलांच्या आरोग्यावर जन शिक्षण संस्था येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आरोग्याशी निगडित विविध शासकीय योजना व आरोग्याची काळजी कशा प्रकारे घेतली पाहीजे या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. निवेदिता माने, बार्टी संस्थेचे प्रकल्प अधिकरी दिलावर सय्यद, बार्टीचे समतादूत प्रेरणा विधाते, जनशिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, शफाकत सय्यद, कमल पवार, कुंदा शिंदे, अनिल तांदळे, उषा देठे, प्रियंका साळवे, विजय बर्वे आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. डॉ. निवेदिता माने यांनी स्त्रीयाचे मानसिक आजार व प्रजनन संस्थेचे आजार याबद्दल माहिती देऊन स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरच्या गंभीर प्रश्नावर मार्गदर्शन करुन महिलांना आरोग्याविषयी जागृक राहण्याचे आवाहन केले.