• Thu. Feb 6th, 2025

फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी शहरात उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

ByMirror

Apr 24, 2022

फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीचा उपक्रम

अहमदनगर(प्रतिनिधी)- लहान मुला-मुलींमध्ये फुटबॉल खेळाची आवड निर्माण होण्यासाठी व शहरातून फुटबॉलचे उत्कृष्ट खेळाडू घडविण्यासाठी फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने उन्हाळी फुटबॉल प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती अकेडमीचे अध्यक्ष मनोज वाळवेकर यांनी दिली.
1 मे पासून गुलमोहर रोड, पारिजात चौक येथील अल्फा स्पोर्टस अ‍ॅण्ड फिटनेस टर्फ मैदानावर हे प्रशिक्षण शिबीर होणार आहे. या शिबीरात विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळाची सविस्तर माहिती, खेळाचे नियम व उत्कृष्ट फुटबॉल खेळण्यासाठी तज्ञ फुटबॉल खेळाडू व प्रशिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. 31 मे पर्यंत एक महिना फुटबॉल प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन फिरोदिया शिवाजीयन्स फुटबॉल अकॅडमीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8208771795 व 9604494961 मोबईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *