• Thu. Mar 13th, 2025

प्रहार मुकबधिर संघटनेचे राज्यव्यापी अधिवेशनात विविध प्रश्‍नांवर चर्चा

ByMirror

May 2, 2023

मुकबधिर लोकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार

अहमदनगर (प्रतिनिधी)- प्रहार मुकबधिर संघटनेचे दुसरे राज्यव्यापी अधिवेशन शहरात उत्साहात पार पडले. यामध्ये मुकबधिर लोकांच्या विविध प्रश्‍नांवर चर्चा करुन सदरील प्रश्‍न सोडविण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला.


बंधन लॉन येथे झालेल्या या अधिवेशनासाठी प्रहार संघटनेचे महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रहार क्रांती संघटनेचे राज्याध्यक्ष प्रकाश शिंदे, गजानन जगताप, शिवकुमार यादव, जुबेर मुनियार, माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अधिवेशनाचे उद्घाटन झाले.


राज्याध्यक्ष प्रकाश शिंदे म्हणाले की, मुकबधिर बांधवांचे अनेक प्रश्‍न प्रलंबीत आहेत. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर प्रश्‍न सुटण्याची गरज आहे. धोरणात्मक निर्णयाने हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी संघटनेचा पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


अ‍ॅड. धनंजय भाऊ म्हणाले की, अपंग, मुकबधीर बांधवांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा सुरु आहे. या वर्गाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी नेहमीच सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या अधिवेशनासाठी माजी नगरसेवक अ‍ॅड. धनंजय जाधव व शांतिकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक सहकार्य मिळाले. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दिपक जाधव, राहुल येनगंदुल, आकाश परभणे, वैभव मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचाल दिशा जाधव हिने केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *