ग्रामस्थांच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकापदी नलिनी रोहिदास भुजबळ यांनी कार्यभार घेतला असता, त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, बन्सी जाधव, बळवंत खळदकर, शांताबाई नरवडे, किरण सांगळे, वर्षा औटी, विजय शिंदे, राणी पाटोळे, संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे कार्य सुरु आहे. गुणवत्तेमुळे जिल्हा परिषद शाळेत मुलांची संख्या देखील वाढत आहे. नुकतेच मुख्याध्यापक पदाची सूत्रे घेतलेल्या नलिनी भुजबळ यांच्या माध्यमातून मुलांना प्रभावीपणे गुणवत्तापूर्ण ज्ञान दानाचे कार्य होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
साहेबराव बोडखे म्हणाले की, प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया रचला जातो. यासाठी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रभावीपणे कार्य सुरु असून, यामध्ये आनखी गती येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सत्काराला उत्तर देताना नलिनी भुजबळ यांनी गुणवत्ता व विद्यार्थ्यांचा सर्वांगीन विकास हेच ध्येय समोर ठेऊन शाळेची वाटचाल सुरु राहणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. मुलांच्या शिक्षणाप्रती असलेली ग्रामस्थांची तळमळ पाहून काम करण्यास आनखी हुरुप येणार असल्याचे त्यांनी सांगितले.