चित्रकला व निबंध स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील चौका-चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या निबंध व चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला. नवनाथ विद्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे व ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक किसन वाबळे, काशीनाथ पळसकर, दत्तात्रय जाधव, उत्तम कांडेकर, तुकाराम खळदकर, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, डॉ. विजय जाधव, अनिल डोंगरे, दिपक गायकवाड, अतुल फलके, गोकुळ जाधव, दिलावर शेख, ज्ञानदेव कापसे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या सचिव मंदाताई डोंगरे, पिंटू जाधव, राजू जाधव, दादा गायकवाड, शंकर गायकवाड, प्रियंका डोंगरे-ठाणगे, दिपक जाधव, जालिंदर आतकर, मयुर काळे, अजय ठाणगे, भाऊसाहेब ठाणगे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, छत्रपतींचा इतिहास समाजासाठी प्रेरणादायी आहे. हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व अठरापगड जातीच्या मावळ्यांना एकत्र केले. त्यांचा स्वाभिमानी लढा व संघर्ष आजच्या युवकांना दिशादर्शक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष साहेबराव बोडखे यांनी शिवाजी महाराजांच्या पराक्रमातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी निसर्ग चित्रासह महाराष्ट्रातील गड, किल्ले, ऐतिहासिक वास्तू व शिवाजी महाराजांचा पराक्रम आपल्या चित्रामध्ये रेखाटला. निबंध स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक शाळांमधून प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. या स्पर्धेचा निकाल लवकरच जाहीर करुन त्याचे बक्षिस वितरण संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी बुधवारी (दि.23 फेब्रुवारी) केले जाणार असून, या चित्र व निबंधाचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.