अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील बबन ठकाराम फलके (दादा) (वय 83 वर्षे) यांचे सोमवार दि.9 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते अत्यंत मनमिळावू व धार्मिक स्वभावाचे असल्याने, सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी राहत्या घराजवळ शोकाकुळ वातावरणात झाला. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
निमगाव वाघाचे बबन फलके यांचे वृद्धापकाळाने निधन
