नवरात्र उत्सवाच्या उखाणे स्पर्धेतील विजेत्या महिलेस सोन्याची नथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात विश्वसनीय सराफची परंपरा असलेल्या दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या दुसर्या शाखेचा शुभारंभ नवनागापूर येथे नुकताच झाला. नवनाथभाऊ दहिवाळ व अरुणा दहिवाळ यांच्या हस्ते सराफच्या नुतन दालनाचा शुभारंभ झाला. यावेळी सचिन दहिवाळ, शितल दहिवाळ, नितीन दहिवाळ, पूजा दहिवाळ आदी उपस्थित होते.
शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त महिलांसाठी उखाणे स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम आलेल्याकांचन प्रमोद आहेर यांना सोन्याची नथ तर भाग्यवान विजेत्यांना पैठणीचे बक्षिस देण्यात आले.

नवनाथभाऊ भगवानराव दहिवाळ खरवंडीकर यांची 43 वर्षांची विश्वसनीय सुवर्ण परंपरा असलेले दहिवाळ सराफ खरवंडीकर सावेडी उपनगरात सेवा देत आहे. विविध प्रकारचे आकर्षक डिजाईन असलेले दागिने महिलांना भुरळ घालत आहे. एकाच छताखाली सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध असल्याने ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नागापूर येथील ग्राहकांच्या सोयीसाठी दुसर्या शाखेचा शुभारंभ करण्यात आला असल्याचे सचिन दहिवाळ यांनी सांगितले.
या कार्यक्रमास ह.भ.प.आदिनाथ महाराज शास्त्री, भगवान महाराज मचे, मौनी महाराज परभणी, प्रताप ढाकणे, अक्षय कर्डिले, सुरेंद्र गांधी, डॉ. फाटके, नवनागापूरचे सरपंच बबनराव डोंगरे, विजय मैड, जयश्री मैड, राजश्री सुवर्णकार, व्यंकटेश्वर सुवर्णकार, मंगेश शहाणे, प्रियांका शहाणे, शैला शहाणे, अनिल फुंदे, प्रदीप फुंदे, सुमित बोर्हाडे, किशोर खोलम, बंडू भिसे यांसह अनेक मान्यवरांनी भेट देऊन नुतन दालनास शुभेच्छा दिल्या. नव्याने सुरु झालेल्या दहिवाळ सराफ दालनामध्ये गळ्यातील मोत्यांचा हार, पायातील पैंजण, गंठण, बोरमाळ, नाकातील नथ, चांदीचे भांडे यांसह विविध डिजाईनचे दागिने उपलब्ध असून, दालनाला भेट देण्याचे आवाहन दहिवाळ यांनी केले आहे.
