चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील ज्ञानसाधना गुरुकुलचे चार विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) चमकले. यामध्ये अनुष्का कोळगे (260 गुण), सोहम कोतकर (248 गुण), सिद्धार्थ गायकवाड (236 गुण), समर्थ टकले (226 गुण) यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविला.

ज्ञानसाधना गुरुकुल क्लासने गुणवत्तेची परंपरा कायम राखली असून, सर्वसामान्य घटकातील व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले जात आहे.
गुणवंत विद्यार्थ्यांना ज्ञानसाधना गुरुकुलचे संचालक प्रा. प्रसाद जमदाडे, प्रा. शाहरुख शेख, प्रा. ज्योती बोरुडे, प्रा. शबाना शेख, प्रा. रुचिता जमदाडे आदीचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे केडगाव ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे
