मंदिरात निनादला देवीचा जयघोष
अहमदनगर (प्रतिनिधी)- चैत्र नवरात्र उत्सवानिमित्त गुढीपाडव्याला पंजाबी सनातन धर्मसभेच्या सर्जेपुरा येथील राधा-कृष्ण मंदिरात विधीवत पूजा करुन बुधवारी (दि.22 मार्च) सकाळी उत्साहात घटस्थापना करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष राकेश गुप्ता यांच्या हस्ते घटस्थापना झाली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शीख, पंजाबी भाविकांनी देवीचा जयघोष केला. तर ट्रस्टच्या विश्वस्तांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. दरवर्षी पंजाबी सनातन धर्मसभेच्या वतीने चैत्र नवरात्र उत्सव साजरा केला जातो.
मंदिरात 29 मार्चला दुर्गाष्टमी, 30 मार्च रोजी श्रीराम नवमी तर 6 एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
