अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत गुंडेगाव (ता. नगर) येथील अस्लम लाला शेख चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याच्या या यशाबद्दल गावाच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. बीएसएनएलचे सेवानिवृत्त कर्मचारी लाला शेख यांचे ते पुत्र आहे. अस्लमचे मोठे बंधू हारुन शेख हे देखील सीए असून, दोन्ही मुलांनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली सीए होऊन यश संपादन केले आहे. या यशाबद्दल शेख परिवाराचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.