• Mon. Jan 27th, 2025

कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सयाजी खरात यांचे निधन

ByMirror

May 7, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष प्राचार्य सयाजी खरात (वय 66 वर्षे) यांचे 5 मे रोजी निधन झाले. ते आंबेडकरी चळवळीमध्ये विद्यार्थीदशेपासून कार्यरत होते. कास्ट्राईब महासंघाचे राज्य उपाध्यक्ष म्हणून ते काम पाहत होते. मागील वर्षापासून आजारी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. प्रवरानगर येथील रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्‍वास घेतला. त्यांना कास्ट्राईब महासंघाच्या वतीने राज्य अध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सुहास धीवर, महिला जिल्हाध्यक्षा नंदाताई भिंगारदिवे यांनी श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यांच्या पश्‍चात आई, पत्नी, दोन भाऊ व दोन मुली आहेत. त्यांच्या निधनाने संघटनेचे व चळवळीचे नुकसान झाल्याची भावना पवळे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *