किंग्ज गेट रोडला सिमला ग्रुपच्या गोल्डन मेडिकलचा शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- औषधे ही जीवनावश्यक गोष्ट बनली असून, कोरोना महामारीत औषधांचे महत्त्व सर्वांना लक्षात आले. सिमला ग्रुप शहरात विविध व्यवसाय करत असताना सेवाभावाने मेडिकल क्षेत्रात पदार्पण केले आहे. प्रत्येक भागात मेडिकल असणे काळाची गरज बनली असून, गरजू घटकांना महागडी औषधे सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन हाजी जुनेद शेख अल्ताफ यांनी केले.

शहरातील किंग्ज गेट रोड येथे सिमला ग्रुपच्या गोल्डन मेडिकलचा शुभारंभ झाला. यावेळी हाजी जुनेद शेख बोलत होते. याप्रसंगी मुश्ताक शेख हाजी इब्राहिम, हाजी शकिल शेख, हाजी फकिर मोहंमद सय्यद, नवेद शेख, हाजी जावेद शेख, अजीम शेख, शाहिद शेख, जिशान शेख, शफी सदाकत हुसेन, मुजफ्फर शेख, जहिर सय्यद, रियाज शेख आदी उपस्थित होते.

गोल्डन मेडिकलच्या माध्यमातून नागरिकांना सर्व प्रकारच्या अॅलोपॅथी, आयुर्वेदिक, युनानी औषधे पुरवली जाणार असून, याबरोबरच कॉस्मिटिक्स, सर्जिकल साहित्य व कंप्लेशनरी फ्रुट प्रॉडक्टचे विविध उत्पादने मिळणार आहे.
या मेडिकलच्या शुभारंभाप्रसंगी नगरसेवक नज्जू पैलवान, मुदस्सर शेख, सचिन जाधव, हाजी मन्सूर शेख, मुजाहिद (भा) कुरेशी, केमिस्ट असोसिएशनचे शहराध्यक्ष दत्ता गाडळकर, जिया सय्यद, अफजल पैलवान, फारुक शेख, संभाजी कदम यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
