भिंगारची खेड्याची प्रतिमा पुसण्याचे काम आमदार जगताप यांनी केले -शिवम भंडारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगारच्या विकासात्मक बदलासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी चालना दिली. अनेक प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी योगदान देऊन भिंगारची खेड्याची प्रतिमा पुसण्याचे काम केले. शहर व उपनगरांचा सर्वांगीन विकास त्यांच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन देवांग कोष्टी समाजाचे भिंगार शहराध्यक्ष शिवम भंडारी यांनी केले.
एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत भिंगारच्या कुंभार गल्ली येथील विठ्ठल-रुक्मिणी व संत गोरोबाकाका मंदिरात पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांची नागरिकांसह संवाद बैठक पार पडली. यावेळी भंडारी बोलत होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीप्रसंगी राष्ट्रवादीचे भिंगार शहराध्यक्ष संजय सपकाळ, डॉ. उद्धव शिंदे, विशाल बेलपवार, सिद्धार्थ आढाव, सरचिटणीस मारुती पवार, संपत बेरड, सागर गायकवाड, फुल ब्रिगेडचे अध्यक्ष संतोष हजारे, डॉ. नेहा शिंदे, संकेत झोडगे, ओंकार फिरोदे, आनंद क्षीरसागर, मिलिंद लालबोंद्रे, ओम भंडारी, आकाश जाधव, गोरख वाघस्कर, शांताराम देवतरसे, मच्छिंद्र मंदिलकर, सूर्यकांत वाघमारे, संजय देवतरसे, राजू देवतरसे, संजय भंडारी आदी उपस्थित होते.
पुढे भंडारी म्हणाले की, सर्व समाजाला बरोबर घेऊन आमदार जगताप यांचे विकास कार्य सुरु आहे. त्यांच्या निधीतून भिंगारचे विविध विकास कामे मार्गी लागले. तर मोठ्या प्रमाणात निधी उपल्ब्ध करुन विकासाला चालना दिण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रा. सिद्धार्थ आढाव म्हणाले, भिंगारकरांचे अनेक प्रश्न आमदार जगताप यांनी प्राधान्याने सोडविले आहे. या भागातील प्रत्येक कार्यकर्ता त्यांच्याकडे प्रश्न घेऊन जात असतो, ते प्रश्न देखील सुटत असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक त्यांच्याशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय सपकाळ यांनी विकास व लोकशाही विचाराने कार्य करणार्या राष्ट्रवादी पक्षाला अनेक जुने कार्यकर्ते जोडलेले आहे. राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदार संग्राम जगताप यांनी भिंगारच्या विकासाला नवसंजीवनी दिली असल्याचे स्पष्ट केले. विशाल बेलपवार म्हणाले की, विकासात्मक व्हिजन काय असते? हे आमदार जगताप यांनी दाखवून दिले. राज्यात सत्ता असो किंवा नसो, त्यांनी विकास हाच एकमेव उद्दिष्ट ठेऊन शहराच्या विकासाला गती दिली. आमदार निधी काय असतो? हे त्यांनी कार्यातून दाखविले असल्याचे सांगितले.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, विकासात्मक व्हिजनने शहर पुढे जात आहे. पुरोगामी विचार व विकासाचा अजेंडा घेऊन राष्ट्रवादी पक्ष कार्यरत आहे. सर्वसामान्यांपर्यंत विकासाचे मुद्दे व पक्षाचे विचार घेऊन जाण्याचे काम या बैठकीतून केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विविध प्रश्न व राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच डॉक्टर्स डे निमित्त डॉ. नेहा शिंदे यांचा तर सामाजिक कार्याबद्दल डॉ. उध्दव शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.