• Mon. Dec 1st, 2025

इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेची जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम जारी

ByMirror

Mar 11, 2023

छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय मानवंदना देण्याचा भाग

मतांसाठी अमिष देणारे, जाततमस व झुंडशाही राबविणारे सत्तापेंढारीं विरोधात डिच्चू कावा करण्याचे आवाहन

अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रीय मानवंदना देण्याचा भाग म्हणून इंडिया अगेन्स्ट तमस स्लेव्हरी संघटनेच्या वतीने जय शिवाजी, जय डिच्चू कावा मोहिम जारी करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. या मोहिमेद्वारे अमिष देऊन मत घेणारे, जाततमस व झुंडशाही राबविणारे सत्तापेंढारीं विरोधात डिच्चू कावा राबविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.


सध्याच्या संसदीय लोकशाही पध्दतीमध्ये आपण शांततामय रितीने जगण्यासाठी कायद्याचे राज्य स्वीकारले आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा डिच्चू कावा हे शस्त्र सर्व मतदारांना उपलब्ध झाले आहे. मतदारांनी आत्म-न्यायालयाचा वापर केला पाहिजे आणि कोणत्या उमेदवार मत देणे देशासाठी आणि स्वतः साठी उपयुक्त ठरणार आहे याचा निर्णय स्वतःच्या अंतरात्म्याच्या विचाराने करावा. जे उमेदवार जाततमस, मानसिक मागासलेले आणि झुंडशाही राबविणारे आहेत त्यांना डिच्चू कावा देण्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे.


मतदारांना दारु, पैसा, कोंबडीच्या बदल्यात विकत घेऊ पाहणारा उमेदवार निवडून दिल्यानंतर तो सत्तेचा वापर जनतेची तिजोरी घरी वाहून नेण्यासाठी करणार आहे. त्यामुळे अशा सत्तापेंढारी उमेदवारांना डिच्चू कावा देणे हिच शिवाजी महाराजांना मानवंदना ठरणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळात संविधान आणि कायद्याचे राज्य आले. परंतू न्याय संस्थेमध्ये न्याय खरेदी विक्री करणारे अनेक एजेंट सर्वत्र आढळून येतात. परंतू त्यांचे व्यवहार हे अंधारात गुप्तपणे होत असल्यामुळे अशा न्याय कर्कासुरांविरुध्द काही एक पुरावा सापडत नाही. त्यामुळे राष्ट्रीय गीताभारत लढयाच्या माध्यमातून न्यायकर्कासुर ओळखा आणि शेजार्‍याला कळवा असा डिच्चू कावा करण्याचा आग्रह या संघटनेने धरला आहे.


महसूल न्याय विक्री आणि न्यायालयातील अनागोंदीबाबत तमाम जनतेला माहिती व्हावी आणि त्यातून न्याय कर्कासुरांवर अंकुश निर्माण व्हावा या एकाच कारणासाठी न्यायकर्कासूर ओळखा आणि शेजार्‍याला कळवा अशी मोहिम जारी करण्यात आली आहे. या मोहिमेला अहमदनगर जिल्हा न्यायालयातील अनेक वकीलांनी पाठींबा दिला असल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हंटले आहे. या मोहिमेला गती देण्यासाठी अ‍ॅड. गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले, डॉ. महेबूब सय्यद, सुधीर भद्रे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *