कडूस व बोडखे यांचे शिक्षण क्षेत्रातील सामाजिक योगदान प्रेरणादायी -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांनी त्यांचा सत्कार करुन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे आदी उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांचे जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी उत्कृष्टपणे कार्य सुरु आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शासनाच्या माध्यमातून त्यांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहे. शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने आधार देत आहे. कोरोना काळातही त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देऊन दुर्बल घटकांना मदत केली. कडूस व बोडखे यांचे शिक्षण क्षेत्रातील सामाजिक योगदान प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कडूस व बोडखे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आमदार अरुणकाका जगताप यांनी शिक्षक नेते बोडखे स्वत:च्या विद्यार्थी दशेतील परिस्थितीची जाणीव ठेऊन गरजूंना आधार देत आहे. शिक्षणाधिकारी कडूस यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य उत्तमपणे सुरु असल्याचे स्पष्ट करुन विशेष कौतुक केले.