• Mon. Jan 27th, 2025

अहमदनगर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते रोडे अपघातातून थोडक्यात बचावले

ByMirror

Aug 14, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे नुकतेच मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातातून थोडक्यात बचावले.


रोडे आपल्या चारचाकी क्रमांक एमएच 01 एकके 3182 या वाहनाने मंत्रालयात कामानिमित्त जात असताना शुक्रवारी रात्री (दि.12 ऑगस्ट) पाठीमागून येणार्‍या भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. सुदैवाने रोडे व त्यांच्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना गंभीर दुखापत झाली नाही.

रोडे बेशुध्द झाल्यावर त्यांना उपचारासाठी खोपोली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती स्थिर झाल्यावर त्यांना नगरला आनण्यात आले आहे. मात्र त्यांच्या वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. मागून आलेला अज्ञात वाहन चालक धडक देऊन फरार झाला असून, सर्वजन सुदैवाने वाचले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *