अशोकभाऊची क्षितिजा ठोंबरे प्रथम तर रूपीबाईची सिद्धी कटारिया द्वितीय व अंजली खाडे उत्तेजनार्थ
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील अहमदनगर महाविद्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या एकल नृत्य स्पर्धेत अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या विद्यार्थिनींनी यश संपादन करुन बक्षिसे पटकाविली. अहमदनगर महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने ही स्पर्धा नुकतीच आयोजित केली होती. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य प्रीतमकुमार बेदरकर व हिंदी विभागाच्या अध्यक्षा ऋचा शर्मा यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देण्यात आली.

या एकल नृत्य स्पर्धेत अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलची विद्यार्थिनी क्षितिजा ठोंबरे हिने प्रथम क्रमांक पटकाविला. या विद्यार्थिनीस संगीता वंगा व पुष्पा गाडे या अध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. तर रूपीबाई मोतीलालजी बोरा उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी सिद्धी कटारिया हिने द्वितीय व अंजली खाडे हिने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले. या दोन्ही विद्यार्थिनींना अध्यापक सोमनाथ नजान यांचे मार्गदर्शन लाभले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या प्रमुखकार्यवाह छायाताई फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्य गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, तसेच भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे प्राचार्य उल्हास दुगड, अशोकभाऊ फिरोदियाचे प्राचार्य प्रभाकर भाबड, रूपीबाई बोरा विद्यालयाचे प्राचार्य अजयकुमार बारगळ यांनी बक्षिसपात्र विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

