जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत चमकले 6 विद्यार्थी
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया हायस्कूल मधील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. नुकतेच घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत इयत्ता पाचवीचे 2 विद्यार्थी तर इयत्ता आठवीच्या 4 विद्यार्थ्यांनी स्थान मिळवले.
या गुणवंत विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा उपाध्याय, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ व मार्गदर्शक शिक्षक उपस्थित होते.
छायाताई फिरोदिया यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन गुणवत्ता टिकवून भवितव्य घडविण्याचे सांगितले. संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी, विश्वस्त सुनंदा भालेराव, अॅड. गौरव मिरीकर यांनी गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत येण्याचा बहुमान पटकाविणारे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवीचे विद्यार्थी- सोहम दादासाहेब कोल्हे, आदित्य अरविंद शेळके, तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचे विद्यार्थी- सृष्टी सुरेश मैड, वेदांत राजेश टाक, सिध्दी प्रमोद मते, राजेश्वरी हेमंतराव मुळे.
