चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त हरदिन मॉर्निंग ग्रुपचा उपक्रम; भाविकांना खिचडी आणि फळांचे वाटप
निसर्गात देवाचे अस्तित्व -संजय सपकाळ
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने श्री शुकलेश्वर महादेव मंदिर परिसरात चौथ्या श्रावणी सोमवारनिमित्त बेलाच्या रोपांची लागवड करण्यात आली. तर भाविकांना उपवासासाठी खिचडी आणि फळांचे वाटप करुन मंदिरास घड्याळाची भेट देण्यात आली.
हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले. यावेळी सुमेश केदारे, विलासराव तोतरे, दीपक धाडगे, रमेशराव वराडे, जहीर सय्यद, सचिन चोपडा, सर्वेश सपकाळ, दिलीप गुगळे, जालिंदर बेल्हेकर, मेजर दिलीप ठोकळ, अशोकराव पराते, अभिजीत सपकाळ, मनोहर दरवडे, सुधीर कपाले, अशोक लोंढे, वेदांत केदारे, दीपकराव बडदे, अनिलराव सोळसे, महेश सरोदे, संजय भिंगारदिवे, एकनाथ जगताप, विकास भिंगारदिवे, विठ्ठल राहिंज, सरदारसिंग परदेशी, दिलीप बोंदर्डे, जालिंदर अळकुटे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज अनावडे, सुरेखा आमले, उषाताई ठोकळ, भारतीताई शेलुकर, सुप्रिया तोतरे, सुकन्या तोतरे, नवनाथ वेताळ, शेषराव पालवे, अश्विन जामगावकर, विजय गांधी, नामदेव जावळे, प्रदीप पिपाडा, शिरीष पोटे, अविनाश जाधव, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, राजू कांबळे, सूर्यकांत कटोरे, अविनाश पोतदार, किरण फुलारी, विश्वास (मुन्ना) वाघस्कर, कुमार धतुरे, योगेश चौधरी, संपत बेरड, संतोष शेलुकर, सखाराम अळकुटे आदींसह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, सर्व धर्म-अध्यात्म निसर्गाशी जोडले गेलेले आहे. निसर्गात देवाचे अस्तित्व आहे. दैवरुपी निसर्गाचा मनुष्याने ऱ्हास केल्याने अनेक संकटे मानव जातीवर ओढवले जात आहे. सर्व धार्मिक ग्रंथामध्ये निर्सगाला महत्त्व दिले असून, भविष्यातील विनाश टाळण्यासाठी मनुष्याने पुन्हा निसर्गाला शरण जाण्याची गरज निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
सुमेश केदारे यांनी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपण व संवर्धनाची राबविण्यात येत असलेल्या चळवळीची माहिती दिली. तर प्रत्येक सण-उत्सव आणि वाढदिवसाला वृक्षारोपणाची जोड देऊन पर्यावरण संवर्धनासाठी हातभार लावले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या अभियानात हरिदनच्या सदस्यांसह भाविकही सहभागी झाले होते. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुभाष पेंढुरकर, रतन मेहेत्रे, सिद्धूतात्या बेरड, रामभाऊ पांढरे, उत्तमराव शिंदे, अजय नागपुरे, महेश रंधे, सचिन साळुंखे, सुनील कसबे, भाऊसाहेब गुंजाळ, पोपटराव भांड, रमेश त्रिमुखे, दत्तात्रेय लाहुंडे, रमेश कराळे, शंकरराव पंगुडवाले, प्रकाश देवळालीकर, माधवराव गायकवाड, रामदास घडसिंग, बबन चिंचिणे, धनंजय नामदे, रामभाऊ झिंजे, विनोद खोत, विनोद बारटक्के, नामदेव ठोकळ आदींनी परिश्रम घेतले.