• Tue. Mar 11th, 2025

किशोर दराडे दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल नगरमध्ये जल्लोष

ByMirror

Jul 3, 2024

गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून समर्थकांचा आनंदोत्सव साजरा

कामाची दखल घेऊन शिक्षक मतदारांनी पुन्हा संधी दिली -वैभव सांगळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- विधानपरिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार किशोर दराडे विजयी झाल्याबद्दल सावेडी उपनगरातील श्रीराम चौकात मंगळवारी (दि. 2 जुलै) संध्याकाळी दराडे समर्थकांनी जल्लोष केला. दराडे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. तर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या जल्लोषात शिक्षक नेते वैभव सांगळे, अशोक आव्हाड, अमोल खाडे, ॲड. युवराज पोटे, भास्करराव सांगळे, हरिश दगडखैरे, पांडुरंग जावळे, राजेंद्र डमाळे, भांड, चव्हाण, संतोष कदम, अनिकेत कराळे, बाबासाहेब बोडखे, कार्ले सर, पालवे, किरण आव्हाड, ज्ञानेश्‍वर आव्हाड, गोरख आव्हाड, महेंद्र हिंगे, रोहित पवार आदींसह शिक्षक समर्थक सहभागी झाले होते.


वैभव सांगळे म्हणाले की, नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघात किशोर दराडे यांनी केलेल्या कामामुळे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले आहे. शिक्षकांचे विविध प्रश्‍न त्यांनी शासनस्तरावर मांडून ते सोडविण्याचे काम केले. या मतदार संघात इतिहास घडला असून, त्यांना शिक्षकांनी दुसऱ्यांदा संधी दिली आहे. शिक्षकांच्या प्रश्‍नावर दराडे यांनी सर्वाधिक प्रश्‍न मांडले व अनेक प्रश्‍न सोडवली. 19 वर्षापासून प्रलंबीत असलेला जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्‍नावर आवाज उठविल्याने तो प्रश्‍न सोडविण्याची कार्यवाही सुरु आहे. शिक्षक दरबार या संकल्पनेतून शिक्षकांची प्रश्‍न सोडविण्याची कामे त्यांनी केली. त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना शिक्षक मतदारांनी पुन्हा संधी दिली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *