• Wed. Jul 16th, 2025

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

ByMirror

Aug 2, 2024

महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वाचे योगदान -अमित काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने सिद्धार्थनगर येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, महिला जिल्हाध्यक्षा जयाताई गायकवाड, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा उपाध्यक्ष महादेव भिंगारदिवे, युवक जिल्हा उपाध्यक्ष प्रविण वाघमारे, युवक नगर तालुकाध्यक्ष आकाश बडेकर, युवक तालुका सरचिटणीस निखिल सुर्यवंशी, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, भिंगार युवक शहराध्यक्ष महेश भिंगारदिवे, ग्रामपंचायत सदस्य शैनेश्वर पवार, सिद्धार्थ ससाणे आदी उपस्थित होते.


अमित काळे म्हणाले की, महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. वंचित, घटकांचे नेतृत्व करुन त्यांनी दुबळ्या समाजाला जागृत करण्याचे कार्य केले. शाहिरी, साहित्य, कांदबरी लेखन करून समाज सुधारणेचे अतुलनीय कार्य करुन समाजाला त्यांनी दिशा दिल्याचे सांगितले.


जयाताई गायकवाड यांनी अण्णाभाऊंनी समाज जागृतीचे कार्य करून परिवर्तन घडविण्यासाठी उभे आयुष्य खर्ची केले. अण्णाभाऊंचे अनुयायी म्हणून समाजात कार्य करताना दीन-दुबळ्यांची सेवा करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *