दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट
अहमदनगर (प्रतिनिधी)- सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु असताना, सोनपावलांनी घरोघरी आगमन झालेल्या गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. पाईपलाईन रोड येथील दहिवाळ सराफ खरवंडीकर यांच्या घरी आकर्षक गौरी-गणेशची सजावट करण्यात आली होती.
घरातील महिला वर्गाने पारंपरिक गौरीला आकर्षक सजावट करुन विधीवत पूजा केली. संपूर्ण जेवण, नैवद्य व विविध वस्तू गौरी-गणपती समोर मांडण्यात आल्या होत्या. तीन दिवसाचा हा उत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या भागातील महिलांसाठी हळदी-कुंकूचा कार्यक्रम देखील पार पडला असल्याची माहिती दहिवाळ सराफच्या संचालिका अरुणा दहिवाळ यांनी दिली. दहिवाळ यांची सुन शितल दहिवाळ व पूजा दहिवाळ यांच्या संकल्पनेने आकर्षक गौरींची सजावट करण्यात आली होती.