• Mon. Dec 9th, 2024

सैनिक बँकेचा भ्रष्टाचार उघड होण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समिती आक्रमक

ByMirror

May 8, 2022

पुणे सहकार आयुक्त कार्यालयासमोर 10 मे ला उपोषण
दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा उघड होण्यासाठी व दोषींवर फौजदारी कारवाई होण्याकरिता अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने 10 मे रोजी सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असल्यची माहिती समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिली.


पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, जिल्हा विशेष लेखापरीक्षण वर्ग 1 अहमदनगर या शासकीय अधिकार्‍यांच्या साखळीने मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांच्या चौकशीत दोषी ठरलेल्या बँक संचालक, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रमुख मागणी संघटनेने केली आहे.


अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून अनेक वर्षे बँकेतील झालेल्या भ्रष्टाचार, अपहार बाबत तक्रारी करत होते. त्या तक्रारीवर पारनेर तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक अहमदनगर कार्यालय व सहकार आयुक्त कार्यालयातील या तीन विभागातील कर्मचार्‍यापासून ते अधिकार्‍यापर्यंत या सर्वांनी सैनिक बँकेतील मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व संचालक मंडळ यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण करत सदर तक्रारी दडपल्या व काहींची थातुरमातुर तपासणी करत सदर प्रकरणांचा निपटारा केला होता. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालत बँकेतील सर्व तक्रारींची सहकार आयुक्तांना पत्र देत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांनी चौकशी केली. त्या चौकशी अहवालात बँक संचालक, कर्मचारी, आधिकारी यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार बँकेची कलम 83 ची चौकशी सुरु असून, अनेक दिवस उलटूनही याबाबत कारवाई झाली नसल्याने अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने उपोषण करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *