• Thu. Dec 12th, 2024

सामाजिक कार्यकर्ते साहेबराव काते यांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार

ByMirror

Jul 6, 2022

आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते स्विकारला पुरस्कार

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव शंकर काते यांनी अमरावतीच्या कला फाऊंडेशनकडून मिळालेला भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते स्विकारला. यावेळी सुनिल साळवे उपस्थित होते. मागासवर्गीय समाजाच्या कल्याणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल काते यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे.


साहेबराव काते भारतीय लहुजी सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत. विविध राजकीय संघटना व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून काते मागासवर्गीय समाजाच्या विकासात्मक कार्यात मागील 22 वर्षापासून योगदान देत आहे. त्यांनी अनेक आंदोलने, चळवळ विविध सामाजिक विषयांवर समाजातील प्रश्‍न मांडून, सदर प्रश्‍न सोडविण्याचे काम केले आहे. तसेच मागासवर्गीय समाजातील गरजू कुटुंबातील व्यक्तींना जातीचे दाखले, वैद्यकिय मदत, विधवा महिलांना पेन्शन मिळवून देणे, रेशन कार्ड, महामंडळाचे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा केला. शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत गरजू लाभार्थ्यांना मिळवून देण्याचे कार्य ते करत आहे. कोरोना महामारीच्या संकटकाळात सामाजिक भावनेने विविध उपक्रम राबवून, गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य त्यांनी केले. तर मागासवर्गीयांचे कर्ज माफ होण्यासाठी ते शासनस्तरावर पाठपुरावा करीत असून, सदर मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या आंदोलनात ते सक्रीय सहभागी झाले होते. या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर पुरस्कार देण्यात आला आहे.


सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांशी चांगले संबंध ठेऊन काते मागासवर्गीय समाजाचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करत आहे. शासनाच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ खर्‍या लाभार्थींना मिळवून देण्यासाठी त्यांची धडपड सुरु असते. महापुरुषाच्या नावाने पुरस्कार मिळाल्याबद्दल आनखी जबाबदारी वाढली असल्याचे स्पष्ट करुन आमदार जगताप यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. समाजाच्या विकासासाठी नेहमीच आपण कटिबध्द राहून कार्य सुरु ठेवले आहे. मागासवर्गीयांची कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट बनली असून, विविध महामंडळाकडून समाजबांधवांनी घेतलेले कर्ज माफ करण्याची मागणी नव्याने स्थापन झालेल्या राज्य सरकारकडे केली जाणार असल्याचे काते यांनी सांगितले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *