अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण जगधने यांना यशवंत सेनेच्या वतीने राजमाता अहिल्यादेवी होळकर समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात यशवंत सेनेच्या जिल्हा मेळाव्यात जगधने यांना यशवंत सेनेचे राज्याध्यक्ष माधव गडदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष विजय तमनर, शहराध्यक्ष कांतीलाल जाडकर, राजेंद्र नजन, रत्ना पाटील, शर्मिला नलावडे, प्रा. डॉ. सुभाष अडावतकर, मुंबई शिवसेनेचे नंदकुमार जाधव, संजय बारहाते, पै. नाना डोंगरे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते विकास जगधने दुर्बल घटकातील लोकांना आधार देऊन त्यांना प्रवाहात आनण्यासाठी नाथ संप्रदाय चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षापासून कार्य करत आहे. ट्रस्टचे ते अध्यक्ष असून, वंचित घटकांचे प्रलंबीत प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. स्वच्छता अभियान, महिला सक्षमीकरण, रक्तदान व वृक्षरोपण आदी विविध सामाजिक उपक्रमात ते अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.