कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीसांमुळे समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून -विजय भालसिंग
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र शहाजी सावंत पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले असता त्यांचा सामाजिक कार्यकर्ते तथा अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे शहराध्यक्ष विजय भालसिंग यांनी सत्कार केला. यावेळी नगर तालुक्याचे सहा. पो.नि. राजेंद्र सानप, संजय सावंत आदी उपस्थित होते.
राजेंद्र सावंत पोलीस दलातील 31 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरुन नुकतेच सेवानिवृत्त झाले. सध्या ते पोलीस अधीक्षक कार्यालयात कंट्रोल रूममध्ये कार्यरत होते. त्यांच्या सेवापुर्तीनिमित्त आम्रपाली गार्डन येथे सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांचा सत्कार सोहळा पार पडला. विजय भालसिंग म्हणाले की, पोलीस दलात अनेक कर्तव्यनिष्ठ व प्रमाणिक पोलीस असल्याने समाजात शांतता, सुव्यवस्था टिकून आहे. सावंत यांनी प्रमाणिकपणे पोलीस दलात सेवा केली. जिल्ह्यातील अनेक गंभीर गुन्हे, दरोडे, खुन प्रकरणाच्या तपासात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. त्यांना 2016 साली पोलीस महासंचालक पदक मिळाले. त्यांनी दिलेली सेवा प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.