• Wed. Dec 11th, 2024

सरकार चषक हॉलीबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना रंगला

ByMirror

Feb 20, 2022

यश-अपयश पचवायची क्षमता खेळाने निर्माण होते -जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने शहरातील पंचपीर चावडी येथील सहकार क्रीडा मंडळ येथे आयोजित करण्यात आलेल्या सरकार चषक व्हॉलीबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व सामना या संघात रंगला होता. या उपांत्यपूर्व सामन्याचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांच्या हस्ते नाणेफेक व चेंडू टोलवून करण्यात आले. यावेळी अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेचे इकबाल शेख, माजी क्रीडा अधिकारी अजय पवार, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, सुधीर चपळगावकर, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाकार्याध्यक्ष अभिजित खोसे, कासम केबालवले, प्रा.श्रीकांत निंबाळकर, प्रा.राजेंद्र धिरडे, डॉ. अनिल बोरगे, राष्ट्रीय खेळाडू राजेंद्र सुद्रीक, आनंद सप्रे, संजय क्षीरसागर, इम्रान सय्यद, अरबाज बागवान, सोफियान शेख, दानिश हुंडेकरी, पंकज ओहोळ, अभिजित खरपुडे, सुदर्शन ढवळे, सैफ शेख, रहीम शेख आदीसह खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले म्हणाले की, शहरात क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी प्रयत्नशील असून, खेळाडूंना व विविध खेळांना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरू आहे. मैदानी खेळाणे युवकांचा सर्वांगीण विकास होतो. रोगप्रतिकारशक्ती वाढीस लागते व मन प्रसन्न राहून, शरीर सुदृढ बनते. खेळाडू हा कोरोना काळात दिवसभर घरामध्ये बसून मोबाईलच्या आहारी गेला. अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्या वतीने युवकांना मैदानात आनण्याचे काम करण्यात आले. यश-अपयश पचवायची क्षमता खेळाडूंना खेळामुळेच निर्माण होते असल्याचे त्यांनी सांगितले.प्रास्ताविकात अभिजित खोसे म्हणाले की, मोबाईलचा अतिरेक वापर कमी होऊन युवकांचा मैदानी खेळाकडे कळ वाढावा, राष्ट्रीय एकात्मता अखंडित राहून बंधुत्व व सामाजिक जातीय सलोखा वाढविण्याच्या दृष्टीने अहमदनगर शहरात उत्कृष्ट सामाजिक कार्य करणारी संस्था अनंत बहुउद्देशीय सेवा संस्थेद्वारे सरकार चषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शहरामध्ये लिग स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली असून, दरवर्षी ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर पुढच्या महिन्यात देखील सहकार क्रीडा मंडळाच्या वतीने हॉलीबॉल खेळाडूंसाठी आमदार चषक घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले. जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी नगर शहरातील मैदाने विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत. मैदानावर विनामूल्य किंवा अल्पदरात प्रशिक्षक उपलब्ध करण्याची मागणीदेखील यावेळी खोसे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल सारसर यांनी केले. आभार सुधीर चपळगावकर यांनी मानले.

उपांत्यपूर्व सामना सहकार क्लब बेग टाईल्स यांच्यात अटातटीचा झाला. यामध्ये सहकार क्लबने पहिल्या व दुसर्‍या फेरीत 21-21 गुण मिळवले. तर बेग टाईल्सला पहिल्या फेरीत 15 व दुसर्‍या फेरीत 16 गुणांवर समाधान मानावे लागले. या सामन्यात सहकार क्लब विजयी झाला. अंतिम सामना सहकार व सरकार क्लब मध्ये मुकुंदनगर येथील अल आमीन मैदानावर रंगणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *