• Wed. Dec 11th, 2024

सत्ताधारी देशात अभासी विकासाचे विश्‍व निर्माण करत आहे -कॉ. तुकाराम भस्मे

ByMirror

Aug 20, 2022

भाकप जिल्हा कौन्सिलच्या चोविसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन

लाल ध्वज फडकवून इन्कलाब जिंदाबाद!…, लाल सलामच्या घोषणा

अहमदनगर (प्रतिनिधी)- सत्ताधारी देशात अभासी विकासाचे विश्‍व निर्माण करत आहे. विकासाचे मॉडेल जनतेसाठी की भांडवलदारांसाठी, सरकार कोणाच्या बाजूने धोरण राबवित आहे? हे जनतेने जाणून घेण्याची गरज आहे. महागाईचा मुद्दा उभा करुन 2014 नंतर सत्तेवर आलेल्या भाजप सरकारच्या काळात महागाई कुठे पोहचली आहे. धर्म आणि जातीच्या नावाने जनतेला भ्रमित करून राज्य करण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचे प्रतिपादन भाकपचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी केले. केंद्रीय तपासी यंत्रणांचा गैरवापर करुन सत्ताकाबीज करण्याचे काम देशात सुरु असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला.


भारतीय कम्युनिस्ट पक्ष जिल्हा कौन्सिलच्या चोविसाव्या त्रैवार्षिक अधिवेशनच्या उद्घाटनाप्रसंगी कॉ. भस्मे बोलत होते. प्रारंभी पक्षाचा लाल ध्वज फडकवून सलामी देण्यात आली. यावेळी ध्वजगीत, इन्कलाब जिंदाबाद!…, लाल सलामच्या घोषणांनी परिसर दणाणला. शहरातील शिवपवन मंगल कार्यालयात झालेल्या अधिवेशनाप्रसंगी राज्य सहसचिव कॉ. अ‍ॅड. सुभाष लांडे, जिल्हा सचिव कॉ. अ‍ॅड. शांताराम वाळूंज, सहसचिव कॉ. अ‍ॅड. सुधीर टोकेकर, महिला फेडरेशनच्या राज्याध्यक्ष कॉ. स्मिता पानसरे, संतोष खोडदे, भारती न्यालपेल्ली, रमेश नागवडे, कॉ. भैरवनाथ वाकळे, कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते, कारभारी उगले, संजय झिंजे, चंद्रकांत पालवे, अशोक सब्बन, ज्ञानदेव पांडुळे, सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब थोटे, विलास पेद्राम, कॉ. महेबूब सय्यद, निर्मलाताई काटे, पांडुरंग शिंदे, कॉ. अनंत लोखंडे, संजय नागरे, तुषार सोनवणे, दीपक शिरसाठ, संध्या मेढे, राजेंद्र गांधी आदी उपस्थित होते.


पुढे कॉ. भस्मे म्हणाले की, देशभक्तीची वल्गना करणार्‍या सत्ताधार्‍यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान काय? हे सांगावे. भाकपचे अनेक पदाधिकारी यांनी स्वातंत्र्य लढ्यात योगदान देऊन स्वातंत्र्योत्तर काळात सर्वसामान्य श्रमिक, कष्टकर्‍यांच्या हितासाठी लढत आहे. श्रीलंकेत अराजकता माजल्याने जनतेने उठाव करुन सत्ता उलथून लावली. आंदोलन, चळवळ करणार्‍या जनतेची ताकद मोठी असल्याचे सिध्द आहे. आंदोलन, चळवळीत कम्युनिस्ट नेहमीच अग्रभागी राहिले आहे. जनशक्तीचे सामर्थ्य एकवटल्यास नवा इतिहास घडत असतो. सत्ताधार्‍यांचे धोरण व दिशा उजव्याबाजुची असून, डाव्या विचारी लोकांना एकत्र केल्यास सरकारचा हिशोब चुकता करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सरकारचे मुठभर भांडवलदारांसाठी कारभार सुरू असून, अंबानी, अदानी सारख्या भांडवलदारांच्या घशात 10 लाख कोटी रुपये घालण्यात आले. यामुळे विकासदर घटत असताना देशातील काही भांडवलदार जगातील श्रीमंतांच्या यादीत अव्वल ठरल्याचा आरोप भस्मे यांनी केला. दांभिक व हुकूमशाहीपणा देशात सुरू आहे. सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सरकारला खाली खेचण्याचे काम भाकप करणार आहे. धर्म, जातीच्या नावाने यापुढे राजकारण चालणार नाही, हे जनतेने ठणकावून सांगितले पाहिजे. यासाठी धर्मनिरपेक्ष विचाराने भाकप पर्याय देण्यास पुढे आला असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, सरकार कोणतेही असो, श्रमिक कष्टकर्‍यांना लढल्याशिवाय न्याय मिळत नाही. 2014 पूर्वीचे सरकार किमान आंदोलनाची दखल तरी घ्यायचे. मात्र 2014 नंतर सत्तेवर आलेले सरकार आंदोलकांची दखल न घेता आंदोलने दडपण्याचे काम करत आहे. पाशवी अत्याचार करणारे सरकार सत्तेवर आले आहे. माणसात जाती, धर्माच्या नावाखाली फूट पाडून सत्ता राबविली जात असल्याचे स्पष्ट करुन सर्वसामान्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वांनी लाल झेंड्याखाली एकवटण्याचे त्यांनी आवाहन केले. शाहीर कॉ. अनंत लोखंडे यांनी प्रेरणादायी गीत सादर केले. त्यांना संजय नांगरे व संध्या मेढे यांनी साथ दिली.


कॉ. महेबूब सय्यद यांनी कामगारांनी एकवटून बंड करू नये, यासाठी जाती-धर्मात फूट पाडली जात आहे. धर्मांधशक्ती जाऊन लोकशाही विचाराचे सरकार आणण्यासाठी भाकप राजकारणात विचार व दिशा देत असल्याचे त्यांनी सांगितले. कॉ. अनंत लोखंडे यांनी 1925 साली भाकप पक्ष व आरएसएस संघटनेची स्थापना झाली. त्यांनी मात्र धर्माच्या नावाखाली सत्ता काबीज केली असून, भाकपने लोकशाही पुरोगामी विचार जनतेपर्यंत घेऊन जाण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. तसेच यावेळी प्रमुख वक्त्यांनी आपल्या भाषणात देशातील बेरोजगारी, महागाई व धर्माच्या नावाखाली अल्पसंख्यांकांवर होणारे अत्याचाराचे प्रश्‍न मांडले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. एस.बी. जाधव यांनी केले. अधिवेशनात ज्येष्ठ कम्युनिस्ट पदाधिकारी व नवनिर्वाचित तालुका पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी रमेश नागवडे, भगवान गायकवाड, सतीश पवार, रामदास वागस्कर, निवृत्ती दातीर, सुमन आहेर, दस्त्र हासे, लक्ष्मण नवले, विलास नवले, आर.डी. चौधरी, फिरोज शेख, अरुण थिटे, दिपक शिरसाठ, संतोष गायकवाड, महादेव पालवे, धोंडीभाऊ सातपुते, पांडुरंग शिंदे, कॉ. थोटे, विजय केदारे, नितीन वेताळ, तुषार सोनवणे, दत्ता वडवणीकर, सागर साळवे, वैभव कदम, रावसाहेब कर्पे, चंद्रकांत माळी, सगुना श्रीमल, शोभा बिमन, संगिता कोंडा, कमलाबाई दोंता, भाऊसाहेब थोटे, लहू लोणकर आदी परिश्रम घेत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *