• Mon. Dec 9th, 2024

श्रमिकनगरच्या मार्कंडेय शाळेत विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत

ByMirror

Jun 15, 2022

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. तर सर्व शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांसह गुलाबपुष्प व चॉकलेटचे वाटप करण्यात आले.


श्रमिकनगर परिसरात शिक्षकांनी गृहभेटीचा उपक्रम उत्तमपणे राबविल्याने शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती होती. तर नवीन विद्यार्थ्यांनीही शाळेत प्रवेश घेऊन शाळेत हजेरी लावली होती. यावेळी शालेय समितीचे अध्यक्ष जयंत रंगा, नगरसेवक मनोज दुलम, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रमा भैरी, शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे आदींसह विद्यार्थी, पालक व शिक्षक उपस्थित होते. संस्थेचे पदाधिकारी, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य यांनी शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *