आरोपींना त्वरीत अटक करुन फाशी देण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील शीख सिकलगर समाजाच्या वतीने हैदराबाद (तेलंगना) येथे रंगा रेड्डी सुभाषनगर भागात अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन, तिच्या झालेल्या हत्येचा निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणातील आरोपींना तेलंगना सरकारने त्वरीत अटक करुन आरोपींना फाशी देण्याच्या मागणीचे निवेदन शहराचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे यांना देण्यात आले. यावेळी हरजितसिंह वधवा, प्रितपालसिंह धुप्पड, मिलन सिंह, अमर सिंह, युवराज सिंह, करण सिंह, सतनाम सिंह, सोनू सिंह, किशन सिंह, अनिल सिंह, सागर सिंह, मुकद्दर सिंह, राज सिंह, राहुल सिंह आदी समाजबांधव उपस्थित होते.
हैदराबाद (तेलंगना) येथे रंगा रेड्डी सुभाषनगर भागात अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार करुन आरोपींनी मुलीला इमारतीवरुन फेकून दिले. यामध्ये तिचा दुर्देवी अंत झाला. ही घटना संपुर्ण मानवजातीला काळिमा फासणारी आहे. या प्रकरणाने संपुर्ण शीख सिकलगर समाजामध्ये संतप्त भावना असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक करुन त्यांना त्वरीत फाशी देण्याची मागणी करण्यात आली आहे. तेलंगना सरकार आरोपींना अटक करत नाही, तो पर्यंत शीख सिकलगर समाज आंदोलन करणार असल्याचे म्हंटले आहे.