गुणवंत विद्यार्थ्यांना नांव नोंदणी करण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- चर्मकार विकास संघ, लोकनेते मा. आमदार सीतारामजी घनदाट (मामा) सामाजिक प्रतिष्ठान व रविदासिया चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार दि. 10 जुलै रोजी दुपारी 2 वाजता टिळक रोड येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे इयत्ता दहावी, बरावी, पदवीधर आणि विविध शैक्षणिक क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व प्रदेश सचिव प्रा. सुभाष चिंधे यांनी माहिती दिली.
या सन्मान सोहळ्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांच्या मार्कशीटची झेरॉक्स, जातीचा दाखला, पासपोर्ट साईज फोटो, पूर्ण पत्ता, मोबाईल नंबरसह असलेली माहिती 1 जुलै पर्यंत संबंधित प्रतिनिधींकडे जमा करुन नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे अध्यक्ष सुभाष सोनवणे, कार्याध्यक्ष रामदास सोनवणे, सचिव राजेंद्र धस, महिला जिल्हाध्यक्षा (दक्षिण) रुख्मिणी नन्नवरे, महिला जिल्हाध्यक्षा (उत्तर) संगिता वाघचौरे, संतोष कानडे, निलेश आंबेडकर, बलराज गायकवाड, संदीप सोनवणे, मनिष कांबळे, गणेश नन्नवरे, अशोक आंबेडकर, अर्जुन कांबळे, बाळासाहेब कदम, संतोष कांबळे, गणेश लव्हाळे, विनोद कांबळे आदी परिश्रम घेत आहे. विद्यार्थ्यांची माहिती जमा करण्यासाठी सुभाष सोनवणे- 9860159491, रामदास सोनवणे- 9922710565, रुख्मिणी नन्नवरे- 9881811047, संगिता वाघचौरे- 9420069605 यांच्याशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.