बाबासाहेबांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु -सुशांत म्हस्के
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांचा वाढदिवस शहरात सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. शहरातील रामवाडी व गोकुळवाडी भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष गुलामअली शेख, वाहतूक आघाडीचे संदीप वाघचौरे, अल्पसंख्याक शहर जिल्हाध्यक्ष नईम शेख, विजय शिरसाठ, जमीर इनामदार, ऋषिकेश विधाते, शिवम साठे, आजीम खान, जावेद सय्यद, निजाम शेख, हुसेन चौधरी, बंटी बागवान, रामवाडी मित्र मंडळाचे अध्यक्ष पप्पू पाटील, विकी प्रभळकर, सचिन बाबनी, विशाल भिंगारदिवे, सुधीर गायकवाड, संजय साळी, सोनू भंडारी, फ्रान्सिस पवार आदी उपस्थित होते.
शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के म्हणाले की, दीन-दुबळ्या घटकांना आधार व पाठबळ देण्याचे कार्य आरपीआय करत आहे. वंचितांचे प्रश्न सोडविणे या प्रमुख उद्देशाने पक्षातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता योगदान देत आहे. वंचित, दुर्बल व शोषितांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआयच्या माध्यमातून संघर्ष केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र गवई यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने स्वाभिमानाने पक्षाची वाटचाल सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.