नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील डावरे गल्ली येथील नामदेव शिंपी समाज ट्रस्टच्या नामदेव विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्त विधीवत महापूजा करण्यात आली. नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांच्या हस्ते सकाळी मंदिरातील विठ्ठल-रुक्मिणीच्या मुर्तीस महाभिषेक घालून पूजा करण्यात आली.
यावेळी नामदेव शिंपी समाज ट्रस्टचे सचिव सुरेश चुटके, सहसचिव दिलीप गीते, संचालक अनिल गीते, प्रसिध्दी प्रमुख प्रसाद मांढरे, अरुण जवळेकर, रामशेठ पवार, अजय कविटकर, गणेश पवार, प्रफुल्ल जवळेकर, भिंगार शिंपी समाज ट्रस्टचे अध्यक्ष शैलेश धोकटे, शोभा गीते, माधवी मांढरे, स्मिता गीते, मालती पवार, अनिता गीते, कल्पना जाधव, शारदा जवळेकर आदींसह समाजबांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मंदिरात भजन किर्तनाचा कार्यक्रम रंगला होता. तर दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आरती होवून भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. माजी अध्यक्ष अॅड. आनंद मांढरे यांच्या तर्फे भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात फुलांच्या माळांची व विद्युत रोषणाईची आकर्षक सजावट करण्यात आली होती.