अर्जून पुरस्कारार्थी काका पवार यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण
अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघ, हस्ती पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज दोंडाईचा, धुळे व नंदुरबार जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ आयोजित राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारांचे वितरण अर्जून पुरस्कारार्थी पै. काका पवार यांच्या हस्ते झाले. राहता तालुक्यातील प्रवरा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय लोणी खुर्द येथील शारीरिक शिक्षण शिक्षिका विद्यादेवी विष्णू घोरपडे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्य क्रीडा सह संचालक चंद्रकांत कांबळे, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, औद्योगिक सुरक्षा सहसंचालक देविदास गोरे, उद्योगपती अशोक जैन, क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हा क्रीडाधिकारी आसाराम जाधव, कैलास जैन, डॉ. आनंद पवार, शिवदत्त ढवळे, राजेश जाधव, रविंद्र निकम, महेंद्र राजपूत, किशोर जैन, डॉ. विजय नामजोशी आदी उपस्थित होते.
क्रीडा शिक्षकांनी घडवलेल्या खेळाडूंच्या कामागिरीला गुणांकनाधारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून एक या प्रमाणे प्राप्त प्रस्तावातून पुरस्कारार्थींची निवड करण्यात येऊन सन्मानपत्र, मानपत्र, ट्रॅकसुट व प्रमाणपत्र देऊन पुरस्कारार्थींना गौरविण्यात आले. विद्या घोरपडे यांनी फुटबॉल मध्ये अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविले आहेत. घोरपडे यांना आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, खासदास डॉ. सुजय विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, लिलावती सरोदे, मुख्याध्यापिका दीप्ती आडेप, राज्याध्यक्ष राजेंद्र कोतकर, संघटनेचे राज्य खजिनदार घन:शाम सानप, जिल्हाध्यक्ष सुनिल गागरे, सचिव शिरीष टेकाडे, शिक्षक सोसायटीचे संचालक महेंद्र हिंगे, नंदकुमार शितोळे, अजित वडवकर, बापू होळकर, ज्ञानेश्वर रसाळ, राजेंद्र कोहकडे, भाऊसाहेब बेंद्रे आदिंनी घोरपडे यांचे अभिनंदन केले.