पंचक्रोशीतील ग्रामस्थांना लाभ घेण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- वाळूंज (ता. नगर) येथे श्रीहरी किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, 13 मे पासून गावातील हिंगे वस्ती (नगर-सोलापुर रोड) येथे हा धार्मिक सोहळा रंगणार आहे. स्व. माधवराव सोनाजी हिंगे व स्व. सौ. गंगुबाई माधवराव हिंगे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त हिंगे परिवाराच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदकुमार हिंगे व शिवाजी हिंगे यांनी दिली.
शुक्रवार 13 मे ते सोमवार 16 मे पर्यंत हा धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहे. शुक्रवारी सायं. 7 ते 9 ह.भ.प. रामदास दादा रक्ताटे महाराज (लोणी) यांच्या किर्तनाने धार्मिक सोहळ्याची सुरुवात होणार आहे. तसेच शनिवारी सायं. 7 ते 9 ह.भ.प. नंदकिशोर खरात महाराज (नेवासा) व रविवारी सायं. 7 ते 9 ह.भ.प. महंत उध्दव महाराज मंडलीक (नेवासा) यांचे किर्तन होणार आहे. व सोमवारी सकाळी 9 ते 11.30 ह.भ.प. एकनाथ शास्त्री चत्तर महाराज (आळंदी) यांच्या काल्याचे (फुलाचे) किर्तनाने या सोहळ्याचा समारोप होणार आहे. किर्तनानंतर दररोज सर्व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त हिंगे परिवार, नातेवाईक व ग्रामस्थ वाळुंजच्या वतीने करण्यात आले आहे.