• Wed. Dec 11th, 2024

वसंत टेकडीला राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक

ByMirror

Mar 6, 2022

एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रम

भविष्यातील गरज ओळखून शहरात विकासकामे सुरु -विनीत पाऊलबुध्दे

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या विकासाबरोबर उपनगराचा विकास आमदार संग्राम जगताप यांच्या दूरदृष्टीने साधला गेला. व्हिजन घेऊन कार्य करणारे आमदार शहराला मिळाल्याने शहराची विकासात्मक दिशेने वाटचाल सुरू आहे. शहरातील रस्ते भूयारी गटार योजना व फेज-2 च्या कामासाठी खोदले गेल्याने शहरात खड्डे दिसत आहे. मात्र ही कामे पूर्ण झाल्यावर रस्त्यांची कामे मार्गी लागून शहराला एक वेगळे रूप मिळणार आहे. भविष्यातील गरज ओळखून ही कामे केली जात असताना विरोधक चुकीच्या पध्दतीने याचे भांडवल करत आहे. शहराची विकासात्मक दिशेने वाटचाल सुरु असल्याचे प्रतिपादन नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे यांनी केले.
एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी या उपक्रमांतर्गत पक्षाचे प्रगल्भ पुरोगामी विचार कार्यकर्ते व जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रभाग क्रमांक 2 मध्ये वसंत टेकडी येथील साई मंदिरात घेण्यात आलेल्या बैठकित मार्गदर्शन करताना नगरसेवक पाऊलबुध्दे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, नगरसेवक सुनिल सुनिल त्रिंबके, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष अमित खामकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पुढे नगरसेवक पाऊलबुध्दे म्हणाले की, केंद्र सरकार ईडीचा गैरवापर करून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम करण्याचे काम करत आहे. निवडणूक आयोग पासून ते न्यायव्यवस्थेवर दबाव टाकून ते ताब्यात घेण्याचे काम केंद्र सरकारने केले आहे. हुकुमशाही पध्दतीने कारभार चालवला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तर राष्ट्रवादीचे विचार जनसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यकर्त्यांना त्यांनी आवाहन केले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, प्रामाणिकपणे व जबाबदारीने पक्षात काम करत असताना प्रत्येक कार्यकर्त्याने योगदान द्यावे. युवकांना पक्षात काम करण्यास मोठी संधी असून, शहरातील युवा वर्ग आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीशी जोडला गेला आहे. सातत्याने जातीयवाद विचारांची पेरणी समाजात केली जात असताना, सर्वसमावेशक विचारांचे कार्यकर्ते घडविण्यासाठी व पुरोगामी महाराष्ट्राचे विचार रुजविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेवरून या अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सुनिल त्र्यंबके यांनी शब्द पाळणारे नेतृत्व राष्ट्रवादीत आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नगरसेवक होण्याची संधी आमदार संग्राम जगताप व आमदार अरुणकाका जगताप यांच्या माध्यमातून मिळाली. विकासात्मक दृष्टीने लोकांचे प्रश्‍न सोडविण्याचे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या बैठकीसाठी क्रीडा सेलचे शहर जिल्हाध्यक्ष घनश्याम सानप, ओबीसी सेलचे अभिजीत ढाकणे, ग्रामपंचायत सदस्य विशाल सुर्यवंशी, शाम लोंढे, अविनाश लोंढे, सागर मेट्टू, बबलू सुर्यवंशी, प्रताप गायकवाड, वाजिद सय्यद, मोहित ढापसे, निखील त्र्यंबके, आदर्श भालेराव, वैभव पोकळे, हर्षल लोखंडे, यश शर्मा, सोनू परदेशी, देविदास डहाणे, अक्षय माळशिखरे, मनोज आंबेकर, आकाश त्र्यंबके, रोहन कुडिया, अभिषेक खामकर, पार्थ गायकवाड, धीरज उकिर्डे आदी उपस्थित होते. आभार योगेश हिरवे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *