• Wed. Dec 11th, 2024

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबला अधिकृत सनद प्रदान

ByMirror

Aug 30, 2022

युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी रोटरीच्या नवीन क्लबची स्थापना

कार्यक्रमात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय रोटरीच्या पदाधिकार्‍यांचा ऑनलाईन सहभाग

अहमदनगर (प्रतिनिधी)- युवकांच्या विविध प्रश्‍नांवर कार्य करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथचा सनद प्रदान सोहळा शहरात पार पडला. या क्लबमध्ये शहरासह राज्य व परदेशातील सदस्य ऑनलाईन पध्दतीने कार्यक्रमात सहभागी झाले होते. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत हा क्लब युवकांसाठी कार्य करणार आहे.


रोटरीचे जिल्हा राज्यपाल रुक्मेश जाखोटिया, सहाय्यक जिल्हा राज्यपाल अमित बोरकर, माजी जिल्हा राज्यपाल शिरीष रायते, प्रमोद पारीख, जिल्हा प्रमुख डॉ. केदार कहाते, मनीष बोरा, उद्धव शिरसाठ, अभय राजे, दादासाहेब करंजुले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ क्लबची अधिकृत सनद प्रदान करण्यात आली. यावेळी क्लबच्या अध्यक्षा नंदिनी जग्गी, सचिव सविता चढ्ढा, नूतन क्लबच्या सल्लागार डॉ. बिंदू शिरसाठ, खजिनदार जागृती ओबेरॉय, संगीता चंद्रन, तन्वी इस्सार, राजेश जग्गी, किरण कथडे, कविता कथडे, चारुता शिवकुमार आदी उपस्थित होते.

ठाण्यातील आरती म्हात्रे, अमेरिकेच्या हर्षिता टपरीया, कॅनडाच्या नेत्रा प्रभू, बेळगावच्या नरसिंहा जोशी यांनी ऑनलाइन बैठकीत सहभाग नोंदविला. रोटरी इंटरनॅशनल ट्रेनर, रोटरी मेंबरशिप आणि इनोव्हेटिव्ह क्लब्सवर इंटरनॅशनल स्पीकर टॉम गम्प या यूएसए मधील पाहुण्यांनी क्लबच्या सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधून युवकांसाठी सामाजिक कार्य उभे करण्यासाठी प्रेरित केले आणि क्लबच्या स्थापनेसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. तसेच यूएसए मधील या पाहुण्यांनी क्लबचे मानद सदस्यपदही स्विकारले.

रुक्मेश जाखोटिया यांनी क्लबच्या सदस्यांना साक्षरता, कौशल्य विकास, साथरोग प्रतिबंधक यांसारख्या रोटरीच्या सर्व उपक्रमांवर काम करण्यासाठी युवकांसह महिलांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. युवक सक्षम झाल्यास समाजाचा विकास होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रोटरी क्लबने डॉन बॉस्को विद्यालयाच्या रोटरी आंतरराष्ट्रीय डॉन बॉस्को इको क्लबच्या नवीन इंटरॅक्ट क्लबला चार्टर सुपूर्द केले. यावेळी इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण जनजागृतीवर गीत सादर केले. अध्यक्ष शोएब पठाण, गायत्री चौधरी, शिक्षक फ्रान्सिस पाटोळे, फादर जेम्स यांनी प्रमाणपत्र स्विकारले.

रोटरी ई क्लब ऑफ एम्पॉवरिंग यूथ शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवतींच्या विविध प्रश्‍नावर कार्य करणार आहे. या क्लबमध्ये युवकांना सहभागी करुन घेऊन बेरोजगारी, शिक्षण, करिअरची चिंता, कौटुंबिक वाद, व्यसन व आर्थिक प्रश्‍न या सर्व गोष्टींवर कार्य केले जाणार आहे. तसेच युवक-युवतींना सकारात्मक मानसिक व शारिरीक आरोग्यासह सक्षम बनविण्यासाठी साथी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. -डॉ. बिंदू शिरसाठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *