• Wed. Dec 11th, 2024

रिपाईच्या वतीने भिंगार शहरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

ByMirror

Apr 14, 2022

सर्व पक्षीय व सामाजिक संघटनांच्या वतीने अभिवादन
सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी बाबासाहेबांच्या विचारांची खर्‍या अर्थाने गरज -अमित काळे

अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शहरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली. शुक्रवार बाजारपेठ येथे सर्व पक्षीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
या अभिवादन कार्यक्रमासाठी रिपाईचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष सुनिल काळे, आयटी सेल जिल्हा संपर्कप्रमुख मंगेश मोकळ, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य तथा भाजप भिंगार शहराध्यक्ष वसंत राठोड, शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे, युवा मोर्चा शहराध्यक्ष किशोर कटोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल लालबोंद्रे, काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शामराव वागस्कर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष मार्गारेट जाधव, ज्येष्ठ नेते अ‍ॅड. साहेबराव चौधरी, रमेश त्रिमुखे, उद्योजक लोकेश मेहतानी, पप्पू भुतकर, मानस महासंघाचे अध्यक्ष विशाल बेलपावर, महर्षी वाल्मिक फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण घावरी, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय नामदे, सागर चावंडके, आरपीआय मुस्लिम आघाडीचे जिल्हाध्यक्ष शफीक मोगल, जिल्हा कार्याध्यक्ष जावेद पटेल, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, आय टी सेल भिंगार शहराध्यक्ष विक्रम चव्हाण, युवक तालुका उपाध्यक्ष अजय पाखरे, युवक तालुका उपाध्यक्ष विलास साळवे, वसंत भिंगारदिवे, फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष नेत्रदूत जालिंदर बोरुडे, उद्योजक बाळासाहेब तागडकर, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, सुहासराव सोनवणे, किशोर भिंगारदिवे, युवराज पाखरे, बाळासाहेब भिंगारदिवे, सागर क्षीरसागर, सुरेश तनपुरे, प्रशांत पाटोळे, अशोक भिंगारदिवे, अनिल परदेशी, बबलू सिंह. अबिद सरदार, मोहंमद शेख आदी उपस्थित होते.
अमित काळे म्हणाले की, डॉ. बाबासाहेबांच्या विचाराचा जागर होवून, सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी त्यांच्या विचारांची खर्‍या अर्थाने गरज आहे. जनसामान्यांच्या कल्याणासाठी राज्यघटना अस्तित्वात आली. या राज्य घटनेने समाजातील उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *