मोहम्मद पैगंबराबद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधानाचे शहरात पडसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह विधान करणार्या भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्माच्या प्रतिमेस शहरातील कराचीवाला नगर येथे गुरुवारी (दि.9 जून) काळे फासून जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तर पोलीस अधीक्षक कार्यालयात शर्मा हिच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
या आंदोलनात रिपाईचे शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष गुलाम शेख, ओबीसी शहराध्यक्ष सोनू शिरसाठ, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष नईम शेख, अल्पसंख्यांक प्रवक्ता जमीर इनामदार, सचिन शिंदे, विजय शिरसाट, संतोष पाडळे, नियाज शेख, आजीम खान, अरबाज शेख, आफताब बागवान, हूसेन चौधरी, डॉ.प्रकाश बनसोडे, नोमान सय्यद, समीर शेख, अल्तमश शेख, जावेद सय्यद, सज्जाद शेख, हासीम शेख, मोसिन खान, नादिर शेख, समीर पठाण, नसीर शेख, इमरान शेख, आसिफ शेख, आफताब शेख, आयान सौदागर आदीसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नुपुर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल चुकीचे व आक्षेपार्ह केलेल्या वक्तव्याचे रिपाई पक्षाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध नोंदविण्यात आला. प्रेषित मोहम्मद पैगंबर हे फक्त मुस्लिम समाजाचे पैगंबर नसून तर सर्व विश्वाचे व मानव जातीचे पैगंबर आहेत. त्यांनी संपूर्ण विश्वाला शांततेचा व सद्भावनेचा संदेश दिला संपूर्ण विश्वातील मुस्लीम धर्मीय व जगातील इतर कोट्यवधी लोक त्यांचा आदर करतात. त्यांची शिकवणी नूसार जगातील प्रत्येक व्यक्ती समान आहे. त्यांनी कधीही कुठल्याही समाज, धर्म किंवा व्यक्तीवर अन्याय केलेला नाही. त्यांचे अनुयायांनापण हीच शिकवण दिलेली आहे. आज संपूर्ण विश्वातील मुस्लीम व इतर समाजातील लोकांच्या भावना मोठ्या प्रमाणावर दुखावल्या गेल्या आहेत. धार्मिक भावना दुखावल्यामुळे व मोहम्मद पैगंबर यांच्या अवमान केल्याप्रकरणी नुपूर शर्मा या जातीयवादी वृत्तीच्या भाजपा राष्ट्रीय प्रवक्ता यांच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे.