मराठा आघाडी जिल्हाध्यक्षपदी डॉ. महेंद्र झिंजाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी लोकेश बर्वे तर शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा आढाव यांची नियुक्ती
अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षात युवा कार्यकर्ते व महिलांनी प्रवेश केला. शहरातील स्वास्तिक चौक येथील पक्षाच्या संपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी मराठा आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. महेंद्र झिंजाडे, जिल्हा प्रसिध्दीप्रमुखपदी लोकेश बर्वे तर शहर उपाध्यक्षपदी प्रतिभा आढाव यांची नियुक्ती करण्यात आली. आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करुन नवनियुक्त पदाधिकार्यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार केला. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय भांबळ, युवक जिल्हाध्यक्ष विवेक भिंगारदिवे, महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर, नगरसेवक राहुल कांबळे, जिल्ह्याचे नेते संजय कांबळे, भिंगार शहराध्यक्ष आकाश तांबे, तालुकाध्यक्ष अविनाश भोसले, युवकर सरचिटणीस गौरव साळवे, तालुका उपाध्यक्ष विशाल कदम, शहर उपाध्यक्ष योगेश त्रिभुवन, महिला तालुकाध्यक्ष कविता नेटके प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे म्हणाले की, तळागाळातील शोषित व दुर्बल घटकांचे प्रश्न आरपीआयच्या माध्यमातून सोडविले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेने व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरपीआयची वाटचाल सुरु आहे. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना शेवटच्या घटका पर्यंत घेऊन जाण्याचे कार्य आरपीआयचे कार्यकर्ते करीत आहे. आरपीआय हा एका समाजापुरता मर्यादीत नसून, सर्व समाजाला बरोबर घेऊन पुढे जात आहे. सर्व जाती-धर्माचे कार्यकर्ते व पदाधिकार्यांचा समावेश असलेल्या बावीस आघाड्या पक्षात जोमाने कार्य करीत आहे. पक्षात महिलांना देखील संधी देण्यात आली असून, महिलांचे प्रश्न सोडविण्यास महिला आघाडी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.
शहराध्यक्ष किरण दाभाडे यांनी आरपीआयचे संगठन उत्तमपणे सुरु आहे. युवकांच्या माध्यमातून आरपीआय राजकारणात बदल घडविणार आहे. युवक मोठ्या संख्येने पक्षात येत असून, शहरातील प्रत्येक भागात आरपीआयची शाखा सुरु करुन कार्यकर्ते जोडले जाणार असल्याचे सांगितले. नुतन पदाधिकारी यांनी पक्ष वाढविण्यासाठी संगठन करुन वंचित व दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी युवराज पाखरे, अजय डाके, अनिकेत साळवे, राहुल साळवे, भारत वैरागळ, सुमित हजिजा, विजय कराळे, शौकत शेख, प्रविण वाघमारे, महादू भिंगारदिवे, बंटी गायकवाड, शोभा वाघमारे, पद्मा साळवे, आरती धरणे, यमुना गायकवाड आदींसह युवा कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.