पक्षाचा 23 वा वर्धापन दिन साजरा
राष्ट्रवादीच्या बावीस वर्षातील कार्यकाळात महाराष्ट्रातील वाटचाल व विकासात्मक योगदाननाचा आलेख सादर
अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रवादी भवनमध्ये सकाळी 10 वाजून 10 मिनीटांनी पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला. जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रवादीच्या बावीस वर्षातील कार्यकाळात महाराष्ट्रातील वाटचाल व विकासात्मक योगदाननाचा आलेख कार्यकर्त्यांसमोर मांडण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे, नगरसेवक अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, बाळासाहेब बारस्कर, किसनराव लोटके, अशोक बाबर, सिताराम काकडे, शहानावाज खान, भिंगार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय सपकाळ, ओबीसी सेलचे अमित खामकर, अल्पसंख्यांक विभागाचे साहेबान जहागीरदार, कामगार सेलचे गजानन भांडवलकर, मलु शिंदे, रोहिदास कर्डिले, श्याम शिंदे, सचिन मुजजूळे, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, अॅड. शारदाताई लगड, अंजली आव्हाड, विद्याताई भोर, रोहिदास कर्डिले, प्रकाश पोटे, शरद पवार, आबासाहेब सोनवणे, फारूक रंगरेज, अब्दुल खोकर, मनोज भालसिंग, संभाजी पवार, अॅड. मंगेश सोले, अमोल कांडेकर, कुमार नवले, प्रा. भगवान काटे, अभिजीत सपकाळ, गणेश बोरुडे, निलेश इंगळे, दीपक खेडकर, सुनिता गुगळे, शैला गिर्हे, रोहिणी अंकुश आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी महाराष्ट्रात सत्तेत राहून व विरोधी पक्षाची भूमिका देखील राष्ट्रवादी पक्षाने सक्षमपणे सांभाळून राज्याच्या विकासाला चालना दिली. शरद पवार यांच्या रुपाने उत्तुंग नेतृत्व पक्षाला लाभले असून, ही पक्षाची खरी ताकत आहे. पवार साहेबांच्या विचाराने महाविकास आघाडी सरकारची यशस्वीपणे वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रा. माणिक विधाते म्हणाले की, राष्ट्रवादी पक्षाची 22 वर्षातील वाटचाल अतिशय अभिमानास्पद राहिली आहे. समविचारी पक्षांना बरोबर घेऊन राष्ट्रवादीचे समाजकारण सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या रुपाने पक्षाची चांगल्या पध्दतीने बांधणी होऊन कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देऊन पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी कार्य करत आहे. कोरोना काळात आमदार संग्राम जगताप यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार दिला. तर संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टने वंचितांचे आश्रू पुसून त्यांना मदतीचा हात दिला. विकासात्मक व्हिजन घेऊन राष्ट्रवादी पक्ष शहराला व राज्याला विकासाच्या दिशेने घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे महागाई वाढून सर्वसामान्यांना जीवन जगणे अवघड झाले आहे. केंद्र सरकारचे जीवनावश्यक मुद्दे सोडून भावनिक मुद्दयांकडे लक्ष देत आहे. महागाई, बेकारी, शेतकरी व कामगारांचे प्रश्नांवर जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी या भावनिक मुद्दयांच्या आधारे केंद्र सरकार राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला.